नाशिक: बालपणीच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी करुन धमकी देणारे दोघे मित्र गजाआड

नाशिक: बालपणीच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी करुन धमकी देणारे दोघे मित्र गजाआड

नाशिक (प्रतिनिधी): बालपणीच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी करुन धमकी देणारे दोघा मित्रांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

दोघा मित्रांनी आपल्या अल्पवयीन बालपणीच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

प्रशांत शिंदे व यश शिंदे (रा.दोघे आगरटाकळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मैत्रीत फोनवर झालेल्या संवादाची रेकॉर्डींग आणि छायाचित्र होणा-या पतीस दाखविण्याची धमकी देत ही मागणी केल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

याप्रकरणी सतरा वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकमेकांची बालपणाचे मित्र मैत्रीण असून, ते एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच कुटुंबियांनी मुलीचा विवाह नातेवाईक असलेल्या मुलासोबत ठरवून ठेवला. वधू वर विवाह योग्य होताच हा सोहळा पार पडणार आहे.

पण, या तरुणीच्या साखरपुड्यानंतर दोघे संशयित मित्र तिच्या पाठीमागे लागले. गेल्या एप्रिल महिन्यापासून संशयितांनी तिला घराबाहेर पडणे मुश्कील केले असून घर परिसरात आणि कॉलेजमध्ये गाठून तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. आमची इच्छा पूर्ण कर नाही तर मैत्रीत फोनवर केलेल्या गप्पा आणि कॉलेज मध्ये काढलेले फोटो नवरदेवास दाखविण्याची धमकी दिली. संशयितांकडून होणारी मागणी आणि त्रास वाढल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790