नाशिक: बाथरूमच्या गिझर मधून गॅस गळती झाल्याने तरुणीचा गुदमरून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या जेल रोड परिसरात एका तरुणीचा गॅस गळतीमुळे मृत्यू झाला आहे.
बाथरूम मधील गॅस गिझर मधून गॅस गळती झाल्याने या तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
साक्षी अनिल जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, साक्षी अनिल जाधव (वय 22 वर्ष) ही तिच्या परिवारासोबत जेल रोड येथील श्री संकुल अपार्टमेंट येथे राहत होती. नाशिक मधील आरंभ महाविद्यालयात ती एमएचं शिक्षण घेत होती. शनिवारी साक्षी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. मात्र बाथरूममधील गिझर च्या गॅसची गळती झाल्याने बाथरूम मध्ये सर्वत्र गॅस पसरला होता. मात्र हे साक्षीच्या लक्षात न आल्यानं गॅस तिच्या नाका तोंडात गेला. यामुळे साक्षी बाथरूममध्ये बेशुद्ध पडली होती. बराच वेळ झाला तरीही साक्षी बाहेर आली नाही म्हणून घरच्यांनी बाथरूमच्या दरवाजा तोडला असता साक्षी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली.
- दुर्दैवी: विवाह समारंभ आटोपून नाशिकला परतणाऱ्या आयशरला अपघात; नाशिकच्या चार जणांचा मृत्यू
- नाशिक: सासऱ्यावर होणारा कोयत्याचा वार सुनेनं झेलला; हल्लेखोरास अटक
साक्षीला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. जाधव कुटुंबात साक्षी एकुलती एक मुलगी होती. तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.