Ad: नाशिकमध्ये घर शोधताय ? इथे क्लिक करा
नाशिक (प्रतिनिधी): जत्रा हॉटेल चौकात आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
योगेश धर्मा भालेराव (४५) व महेश गायकवाड (४० रा.दोघे हनुमाननगर) झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.
याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपहरणाची तक्रार रोहन भालेराव (रा.सदर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
रोहन भालेराव यांने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडिल योगेश भालेराव आणि आतेभाऊ महेश गायकवाड हे दोघे बुधवारी (दि.२१) रात्री जत्रा हॉटेल चौकात गप्पा मारत उभे असतांना विनीत नामक व्यक्तीसह त्याच्या चार साथीदारांनी दोघांना गाठले. यावेळी संशयितांनी पैश्यांच्या देवाण घेवाणीतून वाद घालत दोघांचे अपहरण केले. याबाबत तक्रारदार यांच्याशी संपर्क साधत संशयितांनी पैसे दिले नाही तर दोघांना जीवे मारू अशी धमकी दिली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत. दरम्यान या घटनेने शहरातील खासगी सावकारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.