नाशिक: पेपर लिहिताना हात सुन्न पडायचा, मेडिकलच्या विद्यार्थ्याचं नाशिकमध्ये टोकाचं पाऊल…

नाशिक (प्रतिनिधी): अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आ त्म ह त्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. योगेश दत्तात्रय बोबडे (वय २२ वर्ष, मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. योगेश हा बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता.

नाशकातील ध्रुवनगर भागात भाडे तत्त्वाच्या खोलीत राहत असताना त्याने दुपारच्या सुमारास ग ळ फा स घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

बोबडे ध्रुवनगर परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या पदवीचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका गृह प्रकल्पात भाडेतत्वावर खोली घेत योगेश व त्याचे मित्र राहत होते. काही महिन्यांपासून त्याला आजारपणामुळे हातात सातत्याने क्रॅम्प यायचे.

नुकत्याच सुरू झालेल्या लेखी परीक्षेत त्याला उत्तरे लिहिणे अवघड झाले. परीक्षेवेळी त्याला हात सुन्न पडला. त्यामुळे योगेशचा मानसिक तणाव अधिक वाढत गेला. परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीसह आजारपणामुळे अधिक वैफल्यग्रस्त झालेल्या योगेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या रूममध्ये गळफास लावून घेत जीवन संपवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

दरम्यान, योगेशने आ त्म ह त्ये पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या कारणांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोतीवाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. योगेशचे कुटुंबीय रात्री उशिराने गावावरुन नाशिकमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी त्याने आपल्या मित्रांना “मी डिप्रेशनमध्ये आहे. मी जात आहे,” असा मेसेज ग्रुपवर टाकला. त्यानंतर ते सर्व जण रूमवर आले असता त्यांना योगेश ग ळ फा स घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here