नाशिक: चोरीच्या मोबाईलवरून महिलेस अश्लील संदेश पाठविणार्यास अटक
नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील पाटीलनगर भागात एका महिलेच्या घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून संबंधित महिलेस अश्लील मेसेज पाठविणार्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की अंबड पोलीस पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यातील एक इसम त्याच्याजवळील चोरीचा मोबाईल हॅण्डसेट विकण्यासाठी संभाजी स्टेडियम येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश सानप यांना मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, पोलीस हवालदार शंकर काळे, संतोष ठाकूर, योगेश सानप व गौरव गवळी यांनी सायंकाळी 7 वाजता संभाजीनगर येथे सापळा लावला होता.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9767,9772,9775″]
काही वेळाने एक इसम स्टेडियमजवळ आला. त्याच्या हातात एक मोबाईल हॅण्डसेट होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता नितीन संजय शिरोळे (वय 24, रा. लखमापूर-धांद्री, ता. बागलाण, जि. नाशिक) असे त्याचे नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडील मोबाईलबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. अधिक चौकशी केली असता हा मोबाईल काही दिवसांपूर्वी सिडको परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार हा मोबाईल हॅण्डसेट गुन्ह्याच्या तपासाकामी जप्त करून चोरट्यासह पुढील कार्यवाहीसाठी अंबड पोलिसांकडे वर्ग केला.
दरम्यान ही कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, पोलीस हवालदार शंकर काळे, अनिल लोंढे, गुलाब सोनार, संतोष ठाकूर, प्रशांत वालझाडे, प्रकाश बोडके, यादव डंबाळे, योगेश सानप आदींनी केली.