नाशिक: कौटुंबिक ओळखीतून विवाहीतेवर बलात्कार; विवाहीत पुरुषाला अटक

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: कौटुंबिक ओळखीतून विवाहीतेवर बलात्कार; विवाहीत पुरुषाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक ओळखीतून घरी पोचलेल्या एकाने विवाहितेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडून मागणी वाढल्याने दोघांमध्ये वाद होऊन महिलेचा मोबाईल फुटल्याने हा वाद पोलिसात पोचला.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

हरिदास काळू गावित (३०, रा. वाघ्याची वाडी, हरसूल, ता. पेठ), असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार, संशयित आणि पीडिता यांच्यात कौटुंबिक ओळख असून, दोघेही विवाहीत आहेत. महिलेशी गेल्या जानेवारीत संशयिताची भेट झाली होती.

अभिमानास्पद: नाशिकच्या गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण!

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

या वेळी महिलेने त्यास घरी बोलावले असता, संशयिताने घरी कुणी नसल्याची संधी साधत महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. स्वत: घरी बोलाविलेले असल्याने महिलेने अत्याचार सहन केला. मात्र, त्यानंतर संशयिताचे येणे जाणे वाढले.

नाशिक: आमिषाला बळी पडून महिलेने गमावली जमा पुंजी; लॉटरीच्या नावाखाली 30 लाखांना गंडा

महिलेचा पती घराबाहेर पडताच संशयित तिच्या घरी येऊन दमदाटी व मारहाण करून नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवू लागला. यामुळे वैतागलेल्या महिलेने रविवारी (ता. २६) त्यास नकार देत कानउघाडणी केली असता संतप्त संशयिताने तिला मारहाण केली. तसेच, तिचा मोबाईल फोडल्याने हा वाद पोलिसात पोचला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790