नाशिक: उड्डाणपुलावर विचित्र अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही…

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या इंदिरा नगर बोगद्याजजवळील उड्डाण पुलावर एक विचित्र अपघात घडलाय.
या अपघातात चार गाड्यांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
आज मध्यरात्री एका ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने ही गाडी उडाणपुलावर उभी होती.
मागून येणारी ट्रकच्या हे लक्षात आल्याने त्याने ओव्हर टेक करणाऱ्या ट्रकला पुढे जाण्यासाठी जागा दिली; मात्र या ट्रकने मागून धडक दिली. त्यात बाजूने जाणाऱ्या एका गाडीला सुद्धा धडक दिली. यानंतर हा ट्रक पंक्चर झालेल्या गाडीला जाऊन धडकला. हे सर्व वाहन धुळ्याच्या दिशेने जात होते. उडाण पुलावरील धुळे जाणारी वाहतूक काही वेळा करिता बंद ती सर्व्हिस रोडने वळविण्यात आली होती.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: “त्या” चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले; धक्कादायक बाबी समोर…
धक्कादायक: नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या; ३ घरेही जाळली
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790