नाशिक: आत्महत्त्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: आत्महत्त्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): तरुणीशी जवळीक साधून तिचे विविध अवस्थेतील फोटो काढले. तसेच तिचा ठरलेला विवाह मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या जाचाला कंटाळून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या करण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणास आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शिवाजी प्रभाकर केदारे (४५, रा. गजानन रो हाऊस,खर्जुल मळा, सिन्नर फाटा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी केदारे याने फिर्यादीच्या मुलीशी जवळीक साधून तिचेसोबत विविध अवस्थेतील फोटो काढून त्या फोटोवरून तिच्यावर दबाव आणून मारहाण केली.

तसेच, तिच्या भावास मारण्याच्या धमक्या देत तिचे लग्नही मोडण्यास कारणीभूत ठरला. या जाचाला कंटाळल्याने फिर्यादीच्या मुलीने २ जून २०१९ रोजी दुपारी गोदावरी नदीपात्रात उडी घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

सदरची गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायधीश एम.ए. शिंदे यांच्यासमोर खटल्याचे कामकाज होऊन प्रत्यक्ष साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी केदारे यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १५ हजारांची शिक्षा ठोठावली आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. एम. बघडाणे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून महिला नाईक आर. एस. आहेर, सहायक उपनिरीक्षक के. एस. दळवी, महिला कॉन्स्टेबल एम.एस. सांगळे यांनी पाठपुरावा केला

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790