नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिकरोडला अकाऊंटंटसोबत संगनमत करून पेट्रोल पंपचालकास 72 लाखांचा गंडा
नाशिक (प्रतिनिधी): पेट्रोल पंपावर काम करणार्याने अकाऊंटंटसोबत संगनमत करून आणखी एकाच्या मदतीने 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मुजीब हबीब पठाण (वय 50, रा. शिंदे गाव) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित अल्तमेश राजमुहंमद सय्यद (रा. सिन्नर) शराफतअली अजगरअली शेख व करामतअली अजगरअली शेख (दोन्ही रा. शिंदेगाव) यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार संशयितांनी जानेवारी 2018 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जनसेवा ट्रान्स्पोर्ट पेट्रोल पंपावर गंडा घातला.
- नाशिक: धक्कादायक! आरोग्य अधिकारी, कर्मचारी सुट्टीवर; रुग्णालयात आईनेच केली मुलीची प्रसुती
- फर्जी 2.0! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी…
पेट्रोल पंपावर अकाऊंटचे काम करणार्या अल्मेश सय्यद याने हैदराबाद रोड करिअरचे मालक शराफतअली व त्याचा भाऊ करामतअली शेख यांच्याशी संगनमत करून डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनांच्या काही पावत्या जमा न करता डिझेलचे पैसे आपसात वाटून घेत मुजीब यांना 72 लाख 15 हजार 946 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.