नाशिककर खबरदार… विनापरवानगी वृक्ष तोडाल तर, भरावा लागणार एक लाखापर्यंतचा दंड

नाशिककर खबरदार… विनापरवानगी वृक्ष तोडाल तर, भरावा लागणार एक लाखापर्यंतचा दंड

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील पर्यावरण प्रेमींच्या संघर्षाला यश आले असून आता वृक्ष तोड करणे भोवणार आहे.

नाशिक शहर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास एक लाख रुपये पर्यंतचा दंड भरावा लागणार असून जेलची हवाही खावी लागू शकते.

नाशिक शहर परिसरात वृक्षांची कत्तल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर काही लोक छाटणीच्या नावावर वृक्षांची कत्तल करत आहे.

यामुळे महापालिका उद्यान विभाग ऍक्शन मोडवर आला असून विनापरवानगी वृक्ष तोडल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर दंडाची कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

दरम्यान महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 अन्वये नागरी क्षेत्रावरील (खाजगी, शासकीय) वृक्ष तोडण्यावर प्रतिबंध घातला आहे. परंतु काही वृक्ष धोकादायक झाली असल्याने जिवितांस व वित्तास हानीकारक ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात.

तर काही वृक्ष ही विकास कामांमध्ये अडथळा ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात. अशा परिस्थितीत अधिनियमातील तरतुदी प्रमाणे वृक्ष तोडणे बाबतच्या प्रस्तावांवर निर्णय होऊन आवश्यकते प्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी भरपाई वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर वृक्ष तोडणेस मंजुरी दिली जाते. मात्र सध्या काही अवैध वृक्षतोड होत असल्याचे प्रशासनाला आढळुन आले आहे.  त्यानुसार शहरातील नागरीक व इमारती उभ्या करणारी मंडळी हे वृक्ष तोडण्याची परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड करत आहे, किंवा वृक्षांचा विस्तार कमी करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने आता कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

नाशिक मनपा उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे म्हणाले की विनापरवानगी व अवैधरित्या वृक्षतोडल्यास वृक्ष कायदा 1975 चे कलम 21 नुसार विनापरवानगी वृक्ष तोड करण्यास दंड करण्याची व सोबतच गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे. त्यानुसार प्रति वृक्ष जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यत दंड व एक आठवडयापासुन एक वर्षापर्यत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तरी नागरीकांनी धोकादायक व बांधकाम बांधित वृक्षांची तोड करण्यासाठी अथवा त्यांची छाटणीसाठी रितसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशिर करवाई करण्यात येईल.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here