नाशिक: टेलिफोन वायरचे काम सुरु असतांना पडला मातीचा ढिगारा; एकाचा मृत्यू

नाशिक: टेलिफोन वायरचे काम सुरु असतांना पडला मातीचा ढिगारा; एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): उड्डाण पुलाखाली खोदण्यात आलेल्या खड्यात टेलिफोनच्या वायरचे काम करण्यासाठी उतरलेल्या कंत्राटी कामगाराचा अचानक अंगावर ढिगारा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा मार्गावरील के के वाघ कॉलेजच्या समोर उड्डाण पुलाखाली टेलिफोन वायर कनेक्शनचे काम सुरू असतांना कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करणारे मजूर हे उड्डाणपुलाच्या खाली खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये उतरून काम करत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

यावेळी यातील एक मजूर हरि राजाराम टिळे (वय ४६ वर्ष ) मोहगाव, तालुका जि.नाशिक. या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा पडला आणि तो या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याची घटना घडली. घटनेची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याला मिळताच येथील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामन दलाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने ढिगार्‍याखाली दबलेल्या मजुराला अथक प्रयत्न करत बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने हा मजूर या घटनेत मृत्यूमुखी पावल्याची माहिती पंचवटी पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8595,8603,8614″]

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790