धक्कादायक: नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितही अल्पवयीन
नाशिक (प्रतिनिधी): म्हसरुळ परिसरातील आदिवासी मुलींसाठीच्या आश्रमात संस्थाचालकानेच सहा मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला असताना, शहरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.
सदरची घटना देवळाली कॅम्प परिसरातील असून, संशयितही अल्पवयीन मुलगा आहे.
यात पीडिता गर्भवती राहून तिने नवजात बाळाला जन्मही दिला आहे.
याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात पोक्सो अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिसात राहणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलगी घरात एकटी असल्याच गैरफायदा संशयित अल्पवयीन मुलाने घेतला. पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. असे त्याने दोन वेळा केले. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. तिने नवजात बाळाला जन्मही दिला.
सदरचा प्रकार गेल्या वर्षभरात झाला असून, पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मोरे हे पुढील तपास करीत आहेत.