नाशिक (प्रतिनिधी): संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून २ जून रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी या पायी आषाढी वारीचे प्रस्थान होणार आहे. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर त्रयोदशीच्या होणार आहे.
नाशिक: सिडकोत २५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; चार संशयित ताब्यात
तसेच प्रथमच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयागतीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सद्गुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधी स्थानी गुरुघरी निवृत्तीनाथ महाराज पालखी पहिला मुक्काम करणार आहे. यंदाच्या वर्षी २ जून ते २८ जून या कालावधीत ही वारी असून, यात ४२ दिंड्या सहभागी होणार आहे.
तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचे हे सातशे पन्नासावे वर्ष असल्याची माहिती निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने देण्यात आली. हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी दिली.