नाशिक: जेवण आटोपून शतपावली करतांना दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; 6 वर्षीय बालक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड येथे रात्रीच्या वेळी जेवण करून शतपावली करणाऱ्या महिलेल्या दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला तर सहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. नाशिकरोड पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोड येथील आदर्श सोसायटी, कॅनाल रोड येथील रहिवासी महिला काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान करुणा अशोक जोगदंड, रंजना हिरे, मंगल निकम, रुजिता पगारे, रेखा दुबे, सोनाली उन्हवणे व सहा वर्षीय मुलगा इशांत उन्हवणे असे पाण्याच्या टाकी जवळून शिवाजी नगरकडे जेवण करून शतपावली करीत जात होते.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

नाशिक: सिडकोत २५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; चार संशयित ताब्यात

मंजुळा स्वीटस समोर पाठीमागून आलेल्या मोटारसायकल क्रं MH15 FW 1474 वरील चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत करुणा अशोक जोगदंड (वय ४५) यांना डोक्याला, छातीला जोरदार मार लागला तर सहा वर्षीय इशांतला कंबरेला मार लागला. करुणा जोगदंड यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी करुणा जोगदंड यांना मृत घोषित केले. इशांत यास उपचारार्थ दाखल केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

त्र्यंबकेश्वरहून संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी ‘या’ तारखेपासून निघणार !

या बाबत सोनाली विनीत उन्हवणे यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली असून दुचाकी चालक समर्थ कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणपत काकड करीत आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

करुणा जोगदंड यांचे पती अशोक जोगदंड यांचा दोन वर्षांपूर्वी कोविड मध्ये मयत झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, आज दुपारी त्यांच्यावर जेलरोड दसक येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here