जुन्या भांडणातूनच अल्पवयीन मित्राचा खून केल्याचे उघड
नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणातून अल्पवयीन मित्राचा खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
वणी गावालगत असलेल्या वाघेऱ्या डोंगरावरून पडून मृत्यूप्रकरणी मयत युवकाच्या मित्रानेच दगडाने खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
वाघेऱ्या डोंगरावरून पडल्याने प्रेम दौलत गांगुर्डे (१६) याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ११ जून रोजी आढळला होता.
वणी येथील प्रेम गांगुर्डे हा ८ जूनपासून बेपत्ता होता. ११ जूनला त्याचा मृतदेह वाघेऱ्या डोंगरावर आढळला.
७५ मीटरवरून पडल्याने त्याच्या डोक्यात मार लागून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. याबाबत त्याचा मित्र श्रावण सकट (१८) याची पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच मागील भांडणाची कुरापत काढून प्रेम गांगुर्डे यास मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत व कर्मचाऱ्यांचा सुरुवातीपासूनच श्रावणवर संशय होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वणी पोलिस करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: उड्डाणपुलावर विचित्र अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही…
नाशिक: “त्या” चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले; धक्कादायक बाबी समोर…
धक्कादायक: नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या; ३ घरेही जाळली
![]()


