घोरवड घाटात आढळली अपघातग्रस्त कार अन् चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह…

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घोरवड घाटात आढळली अपघातग्रस्त कार अन् चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह…

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर- घोटी महामार्गावर घोरवड गावाजवळ काल रात्री दहाच्या सुमारास एक अपघातग्रस्त कार आढळून आली.

या कारचा पूर्ण चक्काचुर झालेला होता . ही कार महामार्गालगतचा कठडा तोडून लगतच्या विहिरीला धडकली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मात्र, या चालकाचा मृतदेह तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी येथे रसवंतीच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सकाळी आढळून आला आहे. घटनेची माहिती समजताच सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली व पंचनामा केला.

सुरुवातीला कारचालकाचा शर्ट शेजारील डोंगराच्या पायथ्याशी सापडला. त्यानंतर कारचालकाचा मृतदेह पोलिसांना कारजवळ नव्हे तर हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे म्हणजे अपघात घडला त्या ठिकाणापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कारचालकचा अपघात होऊन तो हॉटेल जय भवानी येथे येऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, अपघाताचा बनाव करुन आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहे, अशीही चर्चा आहे.

आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे या कारचालकाचे नाव आहे. कारचालक हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता, मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अपघाताच्या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790