नाशिक: गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील ६ जण जखमी

नाशिक: गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील ६ जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडरील कुमावतनगरात आज सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात एकाच घरातील ६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असुन, सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आजपासून बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची 'ऑटो रिक्षा शिस्त मोहीम'

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावतनगरात साडेसहा ते पाऊणे सात वाजेच्या सुमारास परराज्यातून टाईल्सची कामे करणाऱ्या कामगारांच्या घरात गॅस गळती होऊन स्फोट झाला. गुरुवारी रात्री घरातील व्यक्तींकडून गॅस व्यवस्थित बंद करण्याचे राहून गेले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

दरम्यान, सकाळी सकाळी घरातील एका व्यक्तीने काडीपेटी पेटवताच गॅसचा भीषण स्फोट झाला. त्यात घरातील लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरमपाल, विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपूर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपूर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्रदेश, सर्वांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here