नाशिक क्राईम ब्रांच युनिट २ ची कौतुकास्पद कामगिरी !
नाशिक (प्रतिनिधी): वैभव कटारे खू’न खटल्यातील फरार बंदिवान अटक करण्यात आला आहे. हा आरोपी तब्बल २३ वर्षांपासून फरार होता. गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने गुजरातमधील दशकोळी तालुक्यात कुवा गावात ही कारवाई केली. संशयित राजू भाई रामभाऊ जाधव ऊर्फ फौजी या नावाने वास्तव्य करत होता.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी १५ सप्टेंबर १९९२ रोजी नाशिकरोड येथील व्यापारी कांतीलाल कटारे यांचा नातू वैभव कटारे याचे अ’प’ह’र’ण करून दोन लाखांच्या खं’ड’णी’ची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण होत नसल्याने आरोपी बिरजू गिज, रवींद्र पांडे आणि टोळीने अ’मा’नु’ष मा’र’हा’ण करत खू’न केला होता.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना टाडा कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पांडे हा १९९८ रोजी १४ दिवसांच्या संचित रजेवर बाहेर होता. तेव्हापासून तो फरार होता. पथकाचे शामराव भोसले यांना माहिती मिळाली, की तो गुजरातमध्ये आहे. पथकाने अहमदाबाद येथे शोध घेतला असता तो दशकोलो तालुक्यात कुवा गावात राजुभाई जाधव ऊर्फ फौजी असे नाव धारण करून वास्तव्य करत होता. सुरुवातीला विचारपूस केली असता त्याने, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र जेव्हा पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली तेव्हा मात्र तो कबुल झाला. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, श्रीराम पवार, शामराव भोसले, नंदकुमार नंदुर्डीकर, शंकर काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
अभिमानास्पद: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक!
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
नगरसेविका पती कन्नू ताजनेंना न्यायालयाचा ५० हजार रुपये दंड
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!