कोविडसाठी महात्मा जोतीबा फुले योजनेचा लाभ घेणे शक्य; हे माहित असणे आवश्यक

नाशिक (प्रतिनिधी) : देश भरातच नव्हे तर जगभरात कोरोना आजाराने थैमान मांडले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये सुद्धा या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना पुरेपूर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून शहरातील बरीचशी रुग्णालये ही कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

या रुग्णालयापैकी बरीचशी रुग्णालये ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत करण्यात आलेली असून अशा रुग्णालयांमध्ये योजने संबंधी माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आले असून सदरील रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेणे शक्य आहे परंतु सदरील लाभ घेताना लाभ कसा मिळवावा या संदर्भात माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेताना रुग्ण अथवा रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास योजनेशी अंगीकृत करण्यात आलेल्या रुग्णालयात भरती करणे आवश्यक असून भरती करतेवेळीच रुग्णालयाला रुग्णास योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा यासंबंधी कल्पना देणे आवश्यक आहे तसेच रुग्ण रुग्णालयात भरती करताना योजनेसंबंधी कागदपत्रांची पूर्तता करणे ही आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये प्रमुख्याने शिधापत्रिका व आधार कार्ड आणि मतदान कार्ड यासारखे ओळखपत्र या बाबींचा समावेश होतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही प्राथमिक माध्यमिक व तृतीय श्रेणीतील उपचारांपैकी माध्यमिक व तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी लागू असलेली योजना असून कोरोना या आजाराच्या सौम्य मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना योजने अंतर्गत उपलब्ध विशिष्ठ पॅकेज च्या स्वरूपात या योजनेचा लाभ घेता येतो व सदरील रुग्णाची लक्षणे कोणत्या स्तरातील आहेत व योजने अंतर्गत उपलब्ध विशिष्ठ पॅकेज अंतर्गत लाभ सुनिश्चित होतो अथवा नाही हे निश्चित करण्याचे काम योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये रुग्णालयाने नेमलेल्या वैद्यकीय समन्वयकाचे असते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

योजने संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी योजनेशी संलग्नित करण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मदत केंद्र स्थापित करण्यात आले असून तेथे आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे आरोग्यमित्र वैद्यकीय सल्लागार नसून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी सहाय्यक म्हणून कार्यरत असतात तसेच योजने संबंधित वैद्यकीय सल्ल्या व्यतिरिक्त इतर माहिती संदर्भात मदत करण्याकरिता त्यांची नियुक्ती केलेली असते.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

योजनेचा लाभ घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात भरती करते वेळेसच रुग्णालयास योजनेअंतर्गत रुग्णाला समाविष्ट करणे संबंधी कळविणे व कागदपत्रांची ताबडतोब पूर्तता करणे अत्यंत आवश्यक असते. रुग्णाला रुग्णालयातून सुटी देते वेळी अथवा लक्षणे कमी झाल्या नंतर कालांतराने रुग्णास योजनेत समाविष्ट करण्याचा आग्रह धरूनही योजनेचा लाभ मिळविणे शक्य होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. योजने संबंधी अधिक माहिती साठी 155388 अथवा 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here