Ad: Latest Job Openings in Nashik City.
नाशिक (प्रतिनिधी): कामाहून परतलेल्या पित्याला 14 महिन्यांच्या चिमुकलीने पाहिले. आनंदाच्या भरात भेटण्यासाठी चिमुकली घराबाहेर पडली अन् तोच क्षण तिच्यासाठी अंतिम ठरला.
आपल्या मुलीचा डोळ्यांदेखत मृत्यू पाहून पित्याचेही अवसान गळाले. अशी ह्रदद्रावक घटना नाशिक शहरात बुधवारी (ता. १) घडली.
अमजद अखतारखान खान (वय २८, रा. विराट नगर अंबड. मूळ उत्तरप्रदेश) हे पंधरा दिवसांपूर्वी नाशिक मध्ये त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी नातलगांच्या घरी आले होते. आर्थिक गणित जुळविण्यासाठी शहरातील एका खाजगी कंपनीत कामाला जात होते.
बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी आले असता त्यांच्या १४ महिन्यांच्या चिमुकली म्हणजेच आयेजा अमजद खान हिने त्यांना बघितले. वडिलांना बघितल्यानंतर ती आनंदाने धावून त्यांच्याकडे जाऊ लागली. याचवेळी काळाने तिच्यावर झडप घातली.
त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या हसनेन मुजम्मिल खान हे त्यांचे चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच.१५ एच. क्यू. ५६८६) घेऊन घराबाहेर निघाले. त्यांच्या गाडीची धडक रस्ता ओलांडून वडिलांकडे जाणाऱ्या आईजास बसली. काही कळण्याआधीच ती वाहनाच्या चाकाखाली गेली हा प्रसंग हसनेन खान यांच्या लक्षात न आल्याने ते वाहन घेऊन निघून गेले.
Ad: नाशिकला रेडीपझेशन 2BHK टेरेस फ्लॅट विकणे आहे.
आईजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघताच तीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या प्रकाराबाबत वाहन चालक हसनेन खान यांच्या विरोधात वडील अमजद अखतारखान खान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वाहनचालक हसनेन खान याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस हवालदार रवींद्र पानसरे व दीपक शिंदे करत आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790