अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकासह २४ लाखांचा गुटखा जप्त
नाशिक (प्रतिनिधी): अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या पिकअपसह ग्रामीण पोलिसांनी २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार व्हेईकल ऍक्टच्या केसेससाठी पेठ रोड टोल नाका येथे कर्तव्यावर असलेले जिल्हा वाहतूक शाखेच पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख यांना मार्गदर्शन करून काल पेठ रोड टोल नाका या रस्त्यावर सापळा रचून एमएच १५, एचएच १०८७ या क्रमांकाचे पिकअप वाहन पकडून पिकअपवरील चालक मुज्लीम कपिल शेख याची विचारपूस केली असता त्याने माचीसचे पुडे असल्याचे उत्तर दिले.
याबाबत संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी २३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा यावेळी जप्त केला. यावेळी शेख याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गंगापूर रोड: पुत्रप्राप्तीसाठी ५० हजार रुपये मागणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
खळबळजनक: खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू