अभिमानास्पद: नाशिकच्या गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण!

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अभिमानास्पद: नाशिकच्या गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण!

नाशिक (प्रतिनिधी): विष प्राशन केलेल्या तरुणासाठी नाशिकमधील एक महिला डॉक्टर अक्षरशः देवदूत ठरली आहे. डॉक्टर महिलेने गरोदर असूनही जीवाची बाजी लावत तरुणाला जीवदान दिले. रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने स्वतः गर्भवती महिला डॉक्टरने कुठलाही विचार न करता रुग्णवाहिका चालवत नेली आणि तरुणाचे प्राण वाचवले.

म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार यांनी गरोदर अवस्थेतही विष प्राशन केलेल्या तरुणाचे स्वतः ॲम्बुलन्स चालवून प्राण वाचवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

प्राथमिक आरोग्य केंद्र माळसाकोरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पवार या मंगळवारी ड्युटीवर असताना सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मांजरगाव येथील 27 वर्षे युवकाने विष प्राशन केलेल्या अवस्थेत त्याला दाखल केले.

ड्युटीवर असलेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला पुढील उपचाराची गरज होती.

नाशिक: काठे गल्लीत युवकावर प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित मुले ताब्यात

प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असून देखील त्याचा चालक रजेवर असल्याने रुग्णाला निफाड येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते परंतु डॉक्टर प्रियांका पवार या गरोदर अवस्थेत आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रात्री साडेआठ वाजता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन स्वतः रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले रुग्णाचा जीव वाचवणे हाच महत्त्वाचा  हेतू डोळ्यासमोर होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: राष्ट्रीय लोक अदालतीत 13 हजार 204 प्रकरणे निकाली; तब्बल 123 कोटींवर तडजोड शुल्क वसूल !

नाशिक: दुर्दैवी घटना… धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू

ॲम्बुलन्स चालवायचा अनुभव नसल्याने हळूहळू निफाड ग्रामीण रुग्णालय एक ते सव्वा तासात गाठले. रुग्णाला ताबडतोब पुढील उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचल्याने मनाला समाधान वाटले. या घटनेचे डॉक्टर प्रियांका पवार यांचे परिसरात कौतुक होत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

“नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केलेल्या रुग्ण दाखल झाला. रुग्णाची तब्येत गंभीर होती त्याचे प्राण वाचवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते मी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी निफाड येथे नेणे गरजेचे होते माझी परिस्थिती बाजूला ठेवून मी स्वतः रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सारथी ची भूमिका केली. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे रुग्णाचे प्राण वाचले हे माझ्या दृष्टीने जीवनातील खूप खूप महत्त्वाचे आहे.” – डॉ. प्रियंका पवार. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790