अनेक अडचणीतून मार्ग काढत नाशिकच्या तरुणावर दुसऱ्यांदा केलेले किडनी प्रत्यारोपण यशस्वी !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील ३८ वर्षीय रुग्ण समीर (नाव बदललेलं आहे) हे किडनी विकाराने ग्रस्त होते , २०१२ रोजी मुंबई येथे त्यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना किडनी दान केली होती, परंतु दुर्दैवाने अवघ्या दिड वर्षानंतर त्यांना प्रत्यारोपण केलेली किडनी हि रिजेक्शन झाल्याने पुन्हा निष्क्रिय झाली.

2015 रोजी अपोलो हॉस्पिटल नाशिक मधील किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल यांनी रुग्णावर उपचार सुरु केले आणि रुग्णाचे डायलेसिस अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये सुरु करण्यात आले. डायलिसिसला काही दिवस झाल्यानंतर रुग्णाचा फिस्टुला निकामी झाला. यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळी त्यांचे फिस्टुला चे ऑपेरेशन करण्यात आले. यानंतर पुन्हा काही काळाने त्यांच्या फिस्टुला मध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने तो बंद पडण्याच्या स्थितीत असताना तात्काळ उपचार करून फिस्टुलाचे कार्य चालू ठेवण्यात यश आले.

४ वर्ष डायलिसिस सुरु होते. आपण पुन्हा एकदा किडनी प्रत्यारोपण करू शकतो असे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांना सांगण्यात आले आणि ते सुद्धा पुन्हा एकदा किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी तयार झाले, यावेळी रुग्णाच्या दोन्ही बहिणी किडनी द्यायला तयार होत्या परंतु किडनी प्रत्यारोपणा आधी काही तपासण्या करण्यात येतात त्या तपासण्या केल्या असता असे लक्षात आले कि त्या दोन्ही बहिणींचे क्रॉसमॅच रिपोर्ट पॉसिटीव्ह आहेत आणि त्यामुळे हे किडनी प्रत्यारोपण करणे अत्यंत जोखमीचे आहे असे डॉक्टरांचे म्हणणे होते.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

यानंतर रुग्णाकडे कॅडेव्हर प्रत्यारोपणाचा पर्याय उपलब्ध होता आणि रुग्णाचे  कॅडॅव्हर रेजिस्ट्रेशन अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये येथे करण्यात आले. या मध्ये रुग्णाला दुसऱ्या एखाद्या मेंदूमृत व्यक्तीची किडनी मिळण्यासाठी वाट बघावी लागणार होती. रुग्णाच्या पुन्हा तपासण्या करण्यात आल्या या तपासणी मध्ये PRA ची लेवल खूपच जास्त असल्याने कॅडॅव्हर किडनी प्रत्यारोपण करणेही जोखमीचे होते पण दुसरा पर्याय देखील नव्हता.

२०२० मध्ये रुग्णाचा रक्तदाब खूपच वाढल्याने त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि त्याला अपोलो हॉस्पिटल नाशिक मधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण अतिदक्षता विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस चांगली होत होती आणि त्यातच कोव्हीडची लाट आली आणि रुग्णाला कोव्हीड चा संसर्ग झाला पण यातूनही त्याला वाचवण्यात यश आले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

एकूण 7 वर्ष रुग्णाचे डायलिसिस सुरु होते आणि पुन्हा एकदा PRA टेस्ट ची लेवल जास्त असल्याने पुन्हा एकदा किडनी रिजेक्शन होऊ नये याकरिता ३ महिने उपचार करण्यात आले. सुदैवाने रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाकरिता किडनी उपलब्ध झाली आणि दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले.

अपोलो हॉस्पिटल नाशिकचे किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल म्हणाले कि “ दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करणे अत्यंत जोखमीचे असते कारण किडनी मॅच होणे अवघड असते. त्याचप्रमाणे इन्फेक्शनचा धोका देखील जास्त प्रमाणात असतो. शिवाय हि शास्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असते आणि यामध्ये सुरुवातीचे १५ दिवस किडनी रिजेक्शन होण्याची शक्त्यात जास्त असते. अशा वेळी रुग्णावर प्रत्यारोपण करण्याआधी कमीतकमी ३ महिने विशिष्ट उपचार केले (desensitization treatment) जातात; ज्यामुळे किडनीचे रिजेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते. अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये अशा प्रकारचे अवघड किडनी प्रत्यारोपण देखील यशस्वी झाले याचा आनंद आहे” .

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

अपोलो हॉस्पिटल नाशिक चे युनिट हेड अजित झा म्हणाले की, “अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये उपलब्ध असलेले अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या सर्वांमुळे आता पर्यंत ८९ किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार नाशिक मधेच मिळत आहे याचा अभिमान वाटतो”

किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल, युरोसर्जन डॉ. नंदन विळेकर, हृदय शस्रक्रिया तज्ञ डॉ. अभयसिंग वालिया आणि अपोलो टीमने कॅडॅव्हर किडनी प्रत्यारोपण केले आणि रुग्णाला नवीन आयुष्य मिळाले. किडनी प्रत्यारोपण झाल्यावर रुग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी अपोलो हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या आणि प्रशिक्षित परिचारिकांच्या टीम ने देखील विशेष काळजी घेऊन रुग्णाची सेवा केली आणि त्यामुळे रुग्णाची रिकव्हरी देखील लवकर झाली आणि या सर्व अडचणींवर मार्ग काढून अतिशय क्लिष्ट असे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790