प्रशासनाला आली जाग: खून झाल्यानंतर सिडकोतील सोनाली हॉटेल सील..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाच्या निर्बंधांमुळे सायंकाळी ४ नंतर फक्त पार्सल सुविधेला परवानगी आहे. असं असतांना शहरातील अनेक हॉटेल्समध्ये सायंकाळ नंतरही टेबल सुविधा सुरु आहे. एवढेच नाही तर अनेक बार रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीसुद्धा करत आहेत. असाच प्रकार सिडकोतही सुरु होता. बुधवारी (दि. २८ जुलै) सिडकोमध्ये युवकाचा खून झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग सोनाली हॉटेलवर कारवाई करत ते सील करण्यात आलं.
सिडकोतील स्टेट बँकजवळील सोनाली हॉटेलमध्ये बुधवारी (दि. २८) रात्री ९: ४५ च्या सुमारास प्रसाद भालेराव (२५, रा. उपनगर परिसर, नाशिकरोड) या युवकाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. तो मित्रांसोबत जेवण करायला गेला होता. यावेळी अनिल पिटेकर, नीलेश दांडेकर (दोघे रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
राग मनात धरून पिटेकर व दांडेकर यांच्यासह चार ते पाच युवकांनी प्रसादचा खून केला. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयितांचा शोध घेत रात्री उशिरा सापळा रचत पिटेकर व दांडेकर यांना अटक केली असून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास व पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहेत.
या गंभीर घटनेनंतर पोलिस प्रशासनाने संबंधित हॉटेल सील केले खरे, मात्र शहरातील इतर हाॅटेल्सवर कारवाई होत नसल्याने असे गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रावसाहेब मते, मुकादम दीपक लांडगे, राजेंद्र उगले, राजाराम गायकर, कल्पेश लांडगे, अक्षय कांबळे, सुनील पाटील यांनी हाॅटेल सील केले.
तुमच्याकडे बंगला आहे, फ्लॅट आहे.. मला दर महिन्याला पंधरा हजार द्या, नाही तर…