नाशिक: वडिलांच्या खू’नप्रकरणी मुलाला जन्मठेप
नाशिक (प्रतिनिधी): वडिलांचे पत्नीसोबत अनै’तिक संबंध असल्याचा संशय आणि इतर भावांना जास्त पैसे दिले, दुचाकी घेण्यास पैसे दिले नाही म्हणून डो’क्यात द’गडी पा’टा घालून खू’न केल्याच्या गुन्हात आरोपी मुलगा सिद्धार्थ भगवान एडके याला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अभियोग कक्ष विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०१९ रोजी उपनगर येथे मयत भगवान नामदेव एडके यांना त्यांचा मुलगा आरोपी सिद्धार्थ एडके याने पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, तसेच इतर भावांना वडील नेहमी जास्त पैसे देतात, दुचाकी घेण्यासाठी पैसे दिले नाहीत, या वादातून वडील झोपेत असताना त्यांच्या डो’क्यात द’गडी पा’टा घालून खू’न केला होता.
उपनगर पोलिस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा न्यायालयात सादर केला. न्यायाधीश कुलकर्णी यांनी फिर्यादी, पंच, साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थिती जन्य पुरव्यास अनुसरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाकडून सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले.