नाशिक: बहिणीची छेड काढल्याच्या वादातून पंचवटीत युवकाचा खून
नाशिक (प्रतिनिधी): बहिणीची छेड काढल्याच्या वादातून बुधवार (ता.२२) रोजी निलगिरी बागेत राहणाऱ्या एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी संशयित अमोल साळवे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथे राहणारा विकास नलावडे (वय २५) हा संशयीताच्या बहिणीची नेहमी छेड काढत होता. याहून संशयित साळवे व नलावडे यांच्यात वाद यापूर्वी वाद देखील झाले होते.
बुधवार (ता.२२) रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नलावडे याने संशयित साळवे यास निलगिरी बाग येथील बिल्डिंग न.५ जवळ असलेल्या पटांगणात भेटावयास बोलावले आणि मीच तुझ्या बहिणी सोबत लग्न करेन, असे सांगितले.
- Breaking: नाशिकमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
- नाशिक: होंडा सिटी कारची मोटरसायकला धडक; 1 ठार, 1 जखमी
यात संशयित अमोल साळवे (वय २७, रा.निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) यास राग आला. त्याने धारधार शस्त्राने वार केला यात विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला. एका सुजाण नागरिकाने विकास यास लागलीच डॉ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी संशयित अमोल साळवे याचे सह दोघांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.
![]()


