Live Updates: Operation Sindoor

नाशिक: पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिक: पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीला फूस लावत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १३) म्हसरुळ परिसरात उघडकीस आला आहे..

हा पोलिस मुलीला कारमध्ये घेऊन औरंगाबादकडे जाण्याच्या तयारीत असताना म्हसरुळ पोलिसांच्या पथकाने तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने त्याला नांदूरनाका येथे अटक करत मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून..

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8070,8043,8079″]

पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दीपक जठार असे या संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हसरुळ परिसरात कुटुंबीयासह वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी मुलगी घरातून बाहेर गेली ती रात्रीपर्यंत परत न आल्याने पीडित मुलीच्या वडिलांना आपल्या ओळखीचा पोलिस कर्मचारी दीपक जठार याच्याशी संपर्क साधला असता संशयिताने ‘तुम्ही कळजी करु नका, मी शोध घेतो’ असे सांगत मुलीच्या वडिलांना धीर दिला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चेनस्नॅचिंग; चार लाखांचे सोने केले जप्त

रात्र उलटूनही मुलगी परत न आल्याने वडिलांनी सकाळी म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ निरिक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पीडित मुलीच्या मोबाइलचा तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र मोबाइल बंद असल्याने तपासात व्यत्यय आला. पीडितेच्या वडिलांनी सोमवारी पुन्हा संशयित दीपक जठार याच्याशी संपर्क साधला.

👉 हे ही वाचा:  नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती; ४२ ताब्यात

त्याने मुलीला ठक्कर बाजार येथे कारमध्ये ठेवत तालुका पोलिस ठाण्याच्या समोर पीडितेच्या वडिलांना भेटण्यास बोलवले. तिचे मोबाइल लोकेशन मिळत नसल्याचे सांगत ‘तुम्ही काळजी करू नका मी शोध घेत आहे’ असे बोलत निघून गेला. वडिलांना संशय आल्याने त्यांनी ही बाब म्हसरूळ पोलिसांना सांगितली. पोलिसांनी संशयिताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद असल्याचे निदर्शनास आले. शेवटच्या कॉलच्या अधारे तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढला असता औरंगाबाद रोडवर संशयिताचे लोकेशन आढळले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

पथक तत्काळ तेथे रवाना झाले. नांदुर नाका येथे एमएच १५ ईडब्लू ९९९० या क्रमांकाच्या कारमध्ये संशयिताला पथकाने अटक केली व मुलीची सुखरूप सुटका केली. वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी, सहायक निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मधुकर गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. उपनिरीक्षक धनश्री पाटील या तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790