![](http://nashikcalling.com/wp-content/uploads/2022/02/follow.png)
नाशिक : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीनेही स्वत:स पेटवून घेत केली आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक कारणातून माहेरी गेलेल्या पत्नीची हत्या करून फरारी झालेल्या पतीनेही आत्महत्या केली.
संशयिताने स्वतःस पेटवून घेतले. तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना, मंगळवारी (ता. १६) त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
निशांत लक्ष्मीकांत डेंगळे (वय ४१, रा. पवारवाडी, जेल रोड) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. बेळे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे माहेरी गेलेल्या त्याची पत्नी प्रणाली निशांत डेंगळे (वय ३५) हिच्याशी संशयिताने सासूरवाडीला जाऊन वाद घातला व तेथेच पत्नीला गाठून पेटवून दिले, असा त्याच्यावर आरोप आहे.
- नाशिक: बाप आणि मुलाचं भांडण… “या” कारणामुळे बापानेच केला मुलाचा खून…
- नाशिक: मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या
सोमवारी (ता. ९) दुपारी घरात कुणी नसताना कौटुंबिक कारणातून डेगळे दांपत्यातील वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. संतप्त निशांत याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. त्यात, प्रणाली ८० टक्के भाजली होती. या घटनेनंतर संशयित फरारी झाला होता.
तिचा भाऊ सोपान जाधव यांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (ता. १४) उपचार सुरू असताना, तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. १३) भेदरलेल्या निशांत डेंगळे याने जेल रोड येथील त्याच्या राहत्या घराच्या आवारात स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. त्यात तो ४५ टक्के भाजल्याने बहीण स्मिता जाधव यांनी तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी (ता. १६) त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.