नाशिक: दुभाजकाला दुचाकी धडकून चालक ठार, दोन जखमी

हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): भरधाव जाणाऱ्या दुचाकीचालकाचा ताबा सुटून दुभाजकावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला.
सैलानीबाबा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हा अपघात घडला.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेल्मेट नसल्याने डोक्यात मार लागल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
- धक्कादायक: मोबाईल गेमच्या आहारी जाऊन नाशिकला चौथीतल्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
- Breaking: संपूर्ण नाशिक शहरात ह्या दोन दिवशी पाणीपुरवठा नाही…
- नाशिक : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीनेही स्वत:स पेटवून घेत केली आत्महत्या
पोलिसांनी दिलेली माहिती आणि निशांत उबाळे (रा. तपोवनरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊ आकाश ज्ञानेश्वर उबाळे (२४) दुचाकी (एमएच १५ सीआर ५४७४)ने त्याचे दोन मित्र विपुल व कुणाल यांना नांदूरनाक्याकडून सैलानीबाबाकडे जाणाऱ्या रोडवर हेल्मेट परिधान न करता चालवून घेऊन जात होता. समोरून आलेल्या कारमुळे चालक आकाशचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी डिव्हायडरवर जाऊन आदळली. डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याचे डोके डिव्हायडरवर आदळल्याने तो जागीच ठार झाला. त्याचे दोघे मित्र जखमी झाले. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790