नाशिक: कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): मनमाड मालेगाव महामार्गावर कुंदलगाव शिवारात कार अपघातात येवला येथील सिमा प्रमोद केदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
येवला तालुक्यातील चिचोंडी वीज उपकेंद्रांचे उप अभियंता प्रमोद केदार हे आपल्या पत्नी व मुलांसह मालेगावहून येवल्याकडे कार क्रमांक एम एच ४१, ए झेड ००४० ने जात होते. याचवेळी कुंदलगावजवळ एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर आदळली.
- नाशिक: प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
- नाशिक: उपनगरला घरकाम करणाऱ्या महिलेनेच केली दागिन्यांची चोरी
या अपघातात अभियंता प्रमोद केदार यांच्या पत्नी सिमा केदार जागीच ठार झाल्या. तर स्वतः प्रमोद केदार व त्यांची मुलगा व मुलगी गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी पोलिस हवालदार पालवी, उत्तम गोसावी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790