नाशिक: प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक: प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): अनैतिक संबंधातून डॉक्टर पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

विवाहबाह्य संबंधातून डॉक्टर पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने रुग्णालयातील एका खोलीत चक्क भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार पिडीत डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर उघडकीस आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

एका खासगी रुग्णालयातील ४५ वर्षीय डॉक्टरला त्याच्या ४० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत संगनमताने रुग्णालयात बोलावून घेत तेथे वाद घातला.

यावेळी दोघांनी मिळून डॉक्टरला एका खोलीत डांबले. आणि भुलीचे औषध इंजेक्शनद्वारे देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. संशयित महिला व तिच्या प्रियकरविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

संशयित महिलेच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधांची कुणकुण डॉक्टर पतीला लागली होती. त्यामुळे महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांना भुलीचे इंजेक्शन दिल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे संशयित महिला आरोपी ही पेशाने डॉक्टर नाही. तसेच तिचा प्रियकरसुद्धा डॉक्टर नसून एका कुठल्या कंपनीत नोकरी करत असल्याचे समोर आले आहे. या दोघांची माहिती फिर्यादी डॉक्टरच्या मुलाकडून घेण्यात आली आहे. तसेच पिडीत डॉक्टरचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790