धक्कादायक प्रकार; लग्नघरी आलेल्या चुलतीवर पुतण्याने केला अत्याचार!
नाशिक (प्रतिनिधी): लग्नघरी आलेल्या चुलतीवर नजर ठेवली…
“तुझा नवरा दारू पिऊन पडला आहे” असं सांगितलं..
अंधारात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली…
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित चुलतीवर पुतण्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीत नमूद केलेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुर्या करण्यासाठी गेली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास किरण वसंत दिवटे (वय 22, रा. शेणवड बुद्रुक ता. इगतपुरी) हा 28 वर्षीय तरूण घराजवळ पीडित चुलतीकडे आला.
पीडित चुलतीला त्याने आवाज देऊन सांगितले की, नाना (पीडित महिलेचा पती) दारू पिऊन पडला आहे, माझ्यासोबत चल तुला दाखवतो, कुठे आहे ते. महिलेने पुतण्यावर विश्वास ठेवत ती त्याच्यासोबत गेली. रात्रीचा अंधार असल्याने त्याने महिलेला नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले आणि तिचे तोंड दाबून दिला मारहाण केली तसेच चुलतीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी त्याने दिली.
यानंतर या पिडीत महिलेने घडलेला सर्व प्रसंग घरी आल्यावर आरोपीची चुलती व त्याच्या आईला सांगितला. यावर त्यांनी सांगितले की, आपण लग्नघरी आहोत. तु आता गप्प बस घरी गेल्यावर चर्चा करू. घरी आल्यावर या महिलेने घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितल्यावर तिच्या नवऱ्याने आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेत थेट घोटी पोलीस ठाणे गाठुन फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित आरोपी पुतण्या किरण वसंत दिवटे याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पोलीस चौकशीत गुन्हा केल्याची कबुल दिली आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड यांनी अधिक तपास सुरू केला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790