👉 पुठ्ठ्याने भरलेल्या ट्रकने हायवेवर घेतला पेट..

नाशिक (प्रतिनिधी): पिंपळगाव रस्त्यावर असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुठ्ठ्याने भरलेल्या ट्रकने गुरुवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जी’वित हा’नी झाली नाही मात्र ट्रकमधील मालाचे आग लागल्याने मोठं नुकसान झाले आहे.

नाशिकच्या पिंपळगाव टोल नाका परिसरातील साकोरे फाट्याजवळ पुठ्ठ्याने भरलेला एम.एच ०५ .१६११ ह्या नाशिकहुन पिंपळगावच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने अचानक पेट घेतला होता. महामार्ग आणि पिंपळगाव पोलीस प्रशासनाने माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तत्काळ ओझर एच.ए.एल व पिंपळगाव अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तातडीने अग्निशामक प्रशासनाच्या चार ते पाच बंबाच्या वाहनासह पथक घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

अचानक लागलेल्या या आगीमुळे काहीकाळ भीतीचे वातावरण पसरून हायवे वरून ये जा करणाऱ्या वाहनांची काहीकाळ कोंडी झाली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करून दिली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790