😳 नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…

😳 नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…

नाशिक (प्रतिनिधी): किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या पतीला मा’र’हाण करण्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक किसान चोथवे (वय: ३३, राहणार: अश्वमेध नगर, पवार मळा, विठाई नगर, पेठ रोड, पंचवटी) हा त्याच्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवर फिर्यादी महिलेच्या नामको हॉस्पिटलमागे असलेल्या किराणा दुकानात गेला आणि पाण्याची बाटली मागितली. महिला फ्रीजमधून पाण्याची बाटली देत असताना तो फिर्यादीस “आयलव्हयु, तू माझी जानू आहेस, माझ्यासोबत चल” असे म्हणाला. याचा महिलेला राग आल्याने महिलेने त्याच्या थोबाडीत मारले, संशयित आरोपीला त्याचा राग आल्याने त्याने तिला सुद्धा गालावर चापट मारण्याचा प्रयत्न केला मात्र तिने तो चुकवला.

हे ही वाचा:  Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

त्यानंतर संशयित आरोपीने दुकानाच्या रॅकवर ठेवलेली प्लास्टिकची बरणी महिलेच्या अंगावर मारून फेकली. याप्रसंगी महिलेचा पती समजावून सांगण्यासाठी गेला असता, महिलेच्या पतीला शिवीगाळ आणि मा’रहा’ण करण्यात आली.

त्यानंतर संशयित आरोपीने मोटारसायकल जवळ जाऊन, बाईकच्या सीटजवळ ठेवलेला मोठा कोयता घेऊन महिलेच्या पतीला मारण्यासाठी दुकानासमोर गेला.महिलेचा पती घाबरल्याने तो दुकानाच्या आत गेला. त्यावेळी सदर महिला संशयित आरोपीला आडवी गेली अन्य संशयित आरोपीकडून कोयता हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी दीपक चोथवे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी महिलेला व तिच्या पतीस तुम्हाला दोघांना बघून घेऊ अशी धमकी दिली आणि निघून गेले.

हे ही वाचा:  नाशिक: पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात दीपक चोथवे सोबतच विक्रम त्रंबक पगारे आणि राज निवृत्ती शिंदे यांच्या विरोधात विनयभंगाचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. उबाळे करत आहेत.

👉 नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिककरांनो बुधवारच्या (दि. १८ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!
नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790