नाशिक (प्रतिनिधी) : उपनगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाच्या घरातून खोटे कारण सांगत सोन्याचा हार लुटून नेल्याचा प्रकार काल (दि.११) भरदिवसा घडला.
पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी या घरी असतांना जावेद शेख अशी ओळख सांगून तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे असे सांगितले. चेक देण्यासाठी तारण म्हणून सोन्याचे काहीतरी वस्तू दाखवावी लागेल. तुमच्या पतीबरोबर फोनवर बोलणे झाले असून त्यांनी घरातला सोन्याचा हार द्यायला सांगितला आहे असे संशयिताने फिर्यादीला सांगून त्यांच्याकडून सोन्याचा हार घेतला. आणि “मी मॅडमला बोलावतो. तुम्ही ३ कप चहा ठेवा” असे सांगितले. दरम्यान फिर्यादी चहा ठेवायला जात असतांना तो हार घेऊन पळून गेला. म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.डी.परदेशी करत आहेत.