तरुण पत्रकार नितीन पवार यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील तरुण पत्रकार नितीन ठामदेव पवार (३९) यांचे अकाली निधन झाले आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास खाजगी रुग्णलयात अखेरचा श्वास घेतला. काही वर्षापासून ते किडनी विकाराने पीडित होते. यातच जंतुसंसर्ग झाल्याने तब्येत अधिक खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले,भाऊ, बहीण असा परिवार आहे. लोकमत टाईम्स मध्ये ते पाच वर्ष  उपसंपादक म्हणून कार्यरत होते. त्यांचे मूल गाव धुळे होते.  तर वडील पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. पत्रकारीतेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नोकरीला सुरुवात केली.  लोकांचे प्रश्न मांडण्याची त्यांची सतत धडपड असे. यातून त्यांनी मोठा जनसंपर्क तयार केला. त्यांनी गोदावरी प्रदूषण, गड किल्ले संवर्धन आदि प्रश्न मांडले होते.