दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात महिला ठार

दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाल्याची घटना रविवारी (दि.९) पहाटे ५.३० वाजता बॉश कंपनीसमोर घडली. सुषमादेवी धमेंद्र सिंग (४६, रा.दत्तनगर, सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुषमादेवी सिंग अ‍ॅक्टिव्हावरुन रविवारी पहाटे सातपूरमधील बॉश कंपनीसमोरुन जात होत्या. त्यावेळी त्यांची अ‍ॅक्टिव्हा स्लिप झाली. या अपघातात त्या बेशुद्ध झाल्या. उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेमार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरा यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर करत आहेत.