नाशिकमध्ये प्रभागनिहाय भाजीबाजार;हातगाडीवाल्यांना परवानगी

नाशिक शहरामध्ये संचारबंदीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी प्रभागनिहाय भाजीबाजाराची ठिकाणे निश्चित केली आहेत. याशिवाय कॉलनीमध्ये हातगाडीवाल्यांनाही परवानगी देण्यात आली आहे.

फळे, भाजीपाला, मटन, चिकन व मच्छी विक्रेते यांचे नियोजन-

  • भाजीबाजारासाठी परवानगी – सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८
  • महापालिकेचे दोन कर्मचारी ठेवणार देखरेख
  • एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याची जबाबदारी संबंधित कर्मचार्‍यांची असेल
  • दररोज संबंधित ठिकाण निर्जूंतूक करण्यात येईल
  • दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फूट अंतर असेल अशी व्यवस्था
  • भाजी विक्रेत्यांना मास्क व हातमोजे वापरण्याची सक्ती अन्यत्र अनधिकृतरित्या भाजीबाजार बसणार नाही याची जबाबदारी विभागीय अधिकार्‍यांची असेल.