सेल्फी काढताना धरणात बुडून दोघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना मालेगावच्या विराणे धारण येथे घडली. अजंग येथील हर्षल जाधव व रितेश जाधव हे दोघे एका कार्यक्रमासाठी गेले होते.

रस्त्यात विराणे धरणावर चुलत भाऊ भावेशसह धरणावर फिरायला गेले. धरणाच्या पाण्यात उतरून तिघेही सेल्फी घेत होते. अचानक हर्षलचा पाय शेवाळावरून  घसरून तो पाण्यात पडला. रितेशने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.भावेशने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

तोपर्यंत ते बुडाले.परिसरातील नागरिकांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. हर्षलने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होते रितेश बारावी होता.दोन सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली.