त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्रीला दर्शनासाठी बंद !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीला (दि. ११) भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. शुक्रवारी दुपारी शासकीय बैठकीत आधी मंदिर उघडे ठेवण्यात येईल व कोविड नियमानुसार दर्शनव्यवस्था ठेवण्यात येईल असे ठरले होते. परंतु, त्र्यंबकेश्वर येथे कोरोना रुग्ण वाढत असून फार गर्दी करणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे ऐनवेळी मंदिर विश्वस्त बैठकीत रात्री उशिरा महाशिवरात्रीला मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. परंतु नित्यपूजा व दुपारी परंपरागत पालखी सोहळा होईल, असे जाहीर करण्यात आले.