शहर वाहतूक सहायक आयुक्त, नियंत्रण कक्ष कार्यालयाचे स्थलांतर

नाशिक (प्रतिनिधी): शहर वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तांचे कार्यालय आणि नियंत्रण कक्ष विभागाचे गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयात स्थलांतर करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या हस्ते या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

शहर वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्ष आणि सहायक आयुक्त कार्यालय सध्या जुने पोलिस आयुक्तालय शरणपूर रोड येथे कार्यरत होते. या ठिकाणी कामकाज करण्यास जागा कमी पडत असल्याने या कार्यालयाचे स्थलांतर करण्याच्या नियोजनानुसार हा बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे नियंत्रण कक्षासाठी देखील जागा कमी पडत असल्याने या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले.

यावेळी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार, नम्रता देसाई यांच्या सह अधिकारी उपस्थित होते. या दाेन्ही कार्यालयाशी संबंधित काम असल्यास नागरिकांनी शहर वाहतूक विभाग नवीन पत्ता पोलिस आयुक्त कार्यालय तळ मजला, गंगापूर रोड (०२५३-२३०५२२८) येथे संपर्क करावा.