नाशिकरोडला ९० लाखांचं कोकेन जप्त – क्राईम ब्रांचची कारवाई

नाशिक पोलीस सध्या जोमाने काम करत आहेत. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला अवघ्या पाच तासात काल अंबड पोलिसांनी अटक केली होती. आता क्राईम ब्रांचने चक्क ९० लाखाचं कोकेन बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यात दोघे परप्रांतीय तर एक स्थानिक रहिवासी आहे.

सिन्नरफाटा भागातील रेल्वेगेटजवळ स्थानिक गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी तिघांकडुन ८९६ ग्रॅम वजनाचे ९० लाखाचे कोकेन जप्त केले असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कुमार जयप्रकाश यादव (३३, रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) , साहेबाजान साबीदअली शेख(४१, रा. सातपूर), नितिन सोपान खोडक े(३७, नाशिकरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.