नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी प्रशासनकडून अनेक हालचाली सध्या दिसून येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर शहरात आजपासून येत्या २८ जुलैपर्यंत कडकडीत लॉक डाऊन हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावाश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात एकंदरीत वाढत चाललेल्या रुग्ण बघता जिल्हा प्रशासन आता अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. वाढत्या कोरोनाबाधीतांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील १२ दिवस संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आला आहे.