नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा तिसरा संशयित दाखल !

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आज (दि.४ मार्च) कोरोनाचा अजून एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. याआधी, दोन संशयित दाखल झाले होते मात्र त्यांचे रिपोर्ट “निगेटिव्ह” आले होते.

आज (दि.४ मार्च) रोजी एका तरुणाला कोरोनाच्या शक्यतेवरून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा तरुण अमेरिकेहून आलेला आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यानंतर त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णाचे रक्ताचे नमुने आणि इतर चाचण्या करण्यात येत आहेत. सदर रुग्णाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

देशासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे प्रशासन “हाय अलर्ट” वर आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.