उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर….

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यासोबतच बीएसएनएल मोबाईल धारकांना एसएमएस द्वारे निकाल मिळवता येणार आहे. एसएमएस वर निकाल प्राप्त करण्यासाठी MHHSC< Space > Seat Number असा एसेमेस तैप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.