कांदा उत्पादकांचे शोलेस्टाइल आंदोलन

लासलगाव – लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात सतत हाेत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांत असंताेष वाढला आहे. दरराेजच गडगडत असलेले भाव थांबण्यासाठी कांद्याची निर्यात तातडीने खुली करावी व केंद्राचे लक्ष वेधावे या हेतूने शुकवारी पाण्याच्या टाकीवर चढत शेतकरी व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अडीच तास आंदोलन छेडले. नाशकि जिल्ह्यात ११ हजार रुपयांवर कांद्याचे भाव पोहोचल्यानंतर केंद्राने हालचाल करत शहरवासीयांना कांदा कमी दरात उपलब्ध व्हावा या हेतूने कांदा निर्यात बंदी लागू केली. ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात झालेल्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.