नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे विभागीय आयुक्त राजाराम माने आज सेवा निवृत्त झाल्यामुळे हि जागा रिक्त झाली. त्या जागी आता नाशिकचे याधीचे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे कार्यभार सांभाळतील. शासनाने त्यांना त्वरित कार्यभार स्वीकारण्यास सांगितले आहे. येत्या एक दोन दिवसात राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्तपदाचा कारभार स्वीकारतील.
नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची वर्णी !
3 years ago