नाशिक( प्रतिनिधी) : शहराचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसुली उत्पन्नाचे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतंत्र व सुलभ धोरण निश्चित करणार असल्याची माहिती दिली. काल (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली त्यादरम्यान ते बोलत होते.
बैठकी दरम्यान बोलताना गमे म्हणाले, विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रणालीचा प्रभावी वापर होत असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढते आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना, पूरनियंत्रण, पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या , सेवा हमी, डिजिटल रिड्रेसल प्रणालीच्या अंमलबजावणी दरम्यान नाशिकचे कामकाज प्रभावी होते. म्हणून या प्रणालीचे महत्त्व व माहिती लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.