नाशिक: खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे ? हे आहेत दर..

नाशिक (प्रतिनिधी): काही खासगी रुग्णालयांकडून थेट लस खरेदी करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना खासगी रुग्णालयात कोविशिल्डसाठी ८५० रुपये तर कोव्हॅक्सिनसाठी १२५० रुपये मोजावे लागणार आहेत. आधी २५० रुपये द्यावे लागत होते. आता मात्र तीन ते चार पट जादा पैसे द्यावे लागणार आहेत. बुधवारपासून शहरातील विविध खासगी रुग्णालयामध्येही आता लसीकरणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरणाचेही दर कमी करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..