विश्वास नांगरे पाटील यांची अखेर बदली; जाणून घ्या कोण आहेत नवीन पोलीस आयुक्त !

नाशिक (प्रतिनिधी): विश्वास नांगरे पाटील यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी आयपीएस दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे तर प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरु होती. विश्वास नांगरे पाटील यांची बदली मुंबईला (कायदा व सुव्यवस्था) झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४५ जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे.